सोशियल मेडीयावर मैत्री! तरुणीला भेटायला बोलावून चार जणांचा अत्याचार
Breaking News |Pune Crime: सामूहिक बलात्काराच्या घटनेने पुणे पुन्हा हादरलं.
पुणे: हिंजवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ८५ वर्षांच्या महिलेवर २३ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच आता सामूहिक बलात्काराच्या घटनेने पुणे पुन्हा हादरलं आहे. एका महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून आरोपींनी मुलीला भेटायला बोलावले होते. त्यावेळी चौघांनी तिच्यावर अत्याचार केला.
याबाबत माहिती अशी की, पीडिता पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे पीडित तरुणीवर गेल्या चार महिन्यापासून तरुणीसोबत हा प्रकार सुरू होता. चार आरोपी एकमेकांना ओळखत नाहीत. त्यांनी वेगवेगळ्या वेळी तरुणीला बोलावून तिच्यावर अत्याचार केले. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी तिच्या वडिलांच्या फोनवरून सोशल मीडिया वापरत होती. याच्या माध्यमातून तिची आरोपी तरुणांशी मैत्री झाली. त्यातील एकाने तिला महाविद्यालयात भेटायला जाऊन तेथेच तिच्यावर अत्याचार केले.
दुसऱ्या आरोपीने तिच्या घरी जाऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. अन्य दोन आरोपींनीही तिला वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला. याबाबतची माहिती पीडितेने तिच्या मैत्रिणीला सांगितल्या होत्या. तसेच महाविद्यालयात सुरू असलेल्या ‘गुड टच बॅड टच’ अभियानात असलेल्या समुपदेशक तिने आपल्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला. पुण्यातील अत्याचाराचे सत्र काही थांबेनासे झाले आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीचे घटना समोर येत आहे.
Web Title: Four men assaulted a young woman by calling her to meet her
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study