अकोले: अकोले तालुक्यातील माळीझाप शिवारातील एका हॉटेलच्या मागे उसाच्या शेतात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी निवडणूक काळातील कोरड्या दिवशी छाफा टाकत एका कारमधून ४ लाख ४० हजार रुपयांची विदेशी व देशी दारू जप्त केली.
माळीझाप शिवारात हॉटेल जयमल्हारच्या पाठीमागे उसाच्या शेतात कारवाई करण्यात आली. यात आरोपी श्रीकांत चौधरी यास अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एस.डी. परदेशी, आर. एल. कोकरे, संगीता जाधव,सुनील निमसे, विपुल कर्पे , अनिल मेंगाळ, तौसीफ शेख यांचे पथकाने हि कारवाई केली.
Website Title: Four lakhs of liquor seized in akole