Home क्राईम संगमनेर कारागृहातून गंभीर गुन्ह्यातील चार कैदी गज कापून पसार

संगमनेर कारागृहातून गंभीर गुन्ह्यातील चार कैदी गज कापून पसार

Sangamner Crime: संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील कारागृहातून चार कैदी आरोपी  गज कापून पसार झाल्याची घटना.

Four inmates of serious crime escaped from Sangamner Jail

संगमनेर: शहर पोलीस ठाण्यातील कारागृहातून चार कैदी आरोपी  गज कापून पसार झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. या कैद्यांवर बलात्कार, खून असे गंभीर गुन्हे दाखल असून हे आरोपी फरार झाल्याने पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे कारागृहाच्या सुरक्षितेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या चौघांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संगमनेर कारागृहातून चार कैदी पळून गेल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (दि.०८) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. संगमनेर तहसील कार्यालय परिसरात संगमनेर शहर पोलीस ठाणे तसेच इतरही अनेक शासकीय कार्यालये आहेत. शहर पोलीस ठाण्याला लागूनच कारागृह आहे. या कारागृहाचे गज कापून चार कैदी पळून गेले. पळून गेलेल्या चौघांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेले हे आरोपी आहेत. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. पथके रवाना करण्यात आले आहे. या आरोपींना कोणाचा पाठींबा होता का हे देखील पाहणे उचित ठरणार आहे. मात्र या धक्कादायक घटनेने संगमनेरसह अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

संगमनेच्या कारागृह सध्या अनेक कैदी शिक्षा भोगत आहे. काल रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. हे कर्मचारी बंदोबस्तात असतानाही कैदी जेलचे गज कापून पळून जाण्यासाठी ठरले. या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले राहुल काळे, मच्छिंद्र जाधव, रोशन थापा ददेल, अनिल काळे हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या आरोपींनी जेलमधून पळ काढला. बंदोबस्तावरील पोलिसांचे दुर्लक्ष व्हावे यासाठी जेलमध्ये मोठ मोठ्याने गाणे आरत्या सुरू होत्या. या गोंधळात या चौघांनी जेलचे गज तोडले. ठरल्याप्रमाणे बाहेर एक कार अगोदरच येऊन थांबलेली होती. जेल तोडून हे कैदी या कार मध्ये बसून पसार झाले.

Web Title: Four inmates of serious crime escaped from Sangamner Jail

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here