संगमनेर: दरोड्याच्या तयारीत असलेले चौघे जेरबंद
Breaking News | Sangamner: दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या चौघांना संगमनेर शहर पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पथकाने पकडले. एअर पिस्तूल, कोयता, हातोडा केला हस्तगत.

संगमनेर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या चौघांना संगमनेर शहर पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पथकाने पकडले. एक साथीदार पळून गेला. ही कारवाई गुरुवारी रात्री नाशिक-पुणे महामार्गावर घुलेवाडी शिवारात केली.
निखिल विजय वाल्हेकर (वय: २४, रा. वेल्हाळे), अनिकेत गजानन मंडलिक (वय २३, रा. माळीवाडा, ता. संगमनेर), मोहन विजय खरात (वय : १९, रा. घुलेवाडी), आदित्य संजय शिंदे (वय: १९. रा. अकोले नाका) यांना पोलिसांनी अटक केली असून ते सध्या पोलिस कोठडीत आहेत.
वाल्हेकर विरोधात ६, मंडलिक विरोधात १० आणि पळून गेलेल्या साई शरद सूर्यवंशी (रा. अकोले नाका, संगमनेर) याच्याविरोधात ९ गंभीर गुन्ह्यांची नोंद शहर पोलिस ठाण्यात आहे.
मुद्देमाल जप्त
आरोपींकडुन १ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्यात एअर पिस्तूल, कोयता, हातोडा, दोरी, लोखंडी कटावणी, दोन दुचाकी वाहने, मिरचीपूड आणि मोबाइल यांचा समावेश आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली.
गस्तीवर असलेल्या संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने पकडलेले दरोड्याच्या तयारीत असलेले चौघे.
…त्यांच्यावरही कारवाई होणार
पकडलेल्या चौघांनी इतरही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलिस करत आहेत. तसेच पळून गेलेल्या साई सूर्यवंशी याचाही शोध सुरू आहे. त्यांच्यावर आतापर्यंत विविध कलमान्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांना फरार असताना मदत करणारे, आसरा देणारे, आर्थिक सहाय्य पुरवणारे अशांचा पोलिस शोध घेत असून, त्यांच्यावरही निश्चित कारवाई केली जाईल.
डॉ. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी
Breaking News: Four arrested for planning robbery
















































