फुगडी खेळताना माजी सभापतींचा मृत्यू
Breaking News | Heart Attack: विठुनामाचा गजर करीत फुगडी खेळताना चक्कर येऊन पडल्याने मृत्यू.
सांगोला (जि. सोलापूर): जवळा (ता. सांगोला) येथील शाळेकडून आषाढी एकादशीनिमित्त काढलेल्या मुलांच्या दिंडीत ‘ज्ञानोबा तुकोबा’, विठुनामाचा गजर करीत फुगडी खेळताना चक्कर येऊन पडल्याने जि. प. चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती साहेबराव बाबासाहेब पाटील (वय ७४) यांचा मृत्यू झाला.
शाळेकडून आषाढी एकादशीनिमित्त काढलेल्या मुलांच्या दिंडीत ‘ज्ञानोबा तुकोबा’, विठुनामाचा गजर करीत फुगडी खेळताना चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. शनिवारी सकाळी १०:३० च्या सुमारास शाळा परिसराच्या आवारात ही घटना घडली. या घटनेनंतर तातडीने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगितले.
Breaking News: Former Speaker dies while playing with balloons heart attack