अहमदनगर: खड्डेमय रस्त्यामुळे अपघातात माजी सरपंचाचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar: खड्डेमय रस्त्यावरून जात असताना खड्डे चुकवताना माजी सरपंचांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.
अहमदनगर: भिंगारमधून जाणाऱ्या – कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर भिंगार शहरात शुक्रवारी (२ फेब्रुवारी) झालेल्या दुर्दैवी अपघातात शहापूरचे माजी सरपंच व नगरच्या आठरे पाटील पब्लिक स्कुलमधील शिक्षक सुनील विजयकुमार बेरड (रा. शहापूर) यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी, कल्याण राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजूर झाले होते. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. हा राष्ट्रीय महामार्ग ३ वर्षापासून खड्डेमय झाला असून नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे. गेल्या १ महिन्यात स्टेट बँक चौक ते चाँदबीबी महालापर्यतच्या रस्त्यावर तीन जण मृत्यूमुखी पडले असून यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच या खड्डेमय रस्त्यावरून जात असताना खड्डे चुकवताना माजी सरपंचांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेने ग्रामस्थ आक्रमक झाले. गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले, यावेळी ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेत ८ दिवसांत या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अन्यथा स्टेट बँक चौकात १० फेब्रुवारी रोजी ग्रामस्थ व भिंगार मधील नागरिक यांच्यावतीने तीव्र रस्तारोको आंदोलन केले जाईल, असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी दिला.
जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता तारडे यांना बोलावून घेत संबंधित रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, असे आदेश दिले तसेच अपघातात नागरिकांचा नाहक बळी जात असून यावेळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना मोबाईलद्वारे घडलेल्या अपघाताचे दृश्य दाखवले, तेव्हा जिल्हाधिकारी व आ. जगताप भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: Former sarpanch dies in an accident due to potholed road
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study