संगमनेर ब्रेकिंग: माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात रुग्णालयात दाखल
MLA Balasaheb Thorat: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला दुखापत झाल्याची घटना. प्रकृती ठीक काळजी करण्यासारखे नाही.
संगमनेर: नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एककीडे महाराष्ट्रात कर्नाटक सीमावादचा प्रश्न तापला असताना दुसरीकडे मोठी घटना घडली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला दुखापत झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. आ. थोरात हे मॉर्निंग वॉक करत असतांना खोलगट भागात पाय गेल्याने ते पडले व डाव्या खांद्याला दुखापत झाली. नागपूरच्या सेमिनरी हिल येथे मोर्निंग वाक करताना ही घटना घडली. नागपूर येथे प्राथमिक उपचार घेतले आहेत. त्यानंतर त्यांना नियमित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणीसाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे. काळजी करण्यासारखे कारण नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business
Web Title: Former Revenue Minister MLA Balasaheb Thorat in hospital
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App