Home अहमदनगर ब्रेकिंग न्यूज! नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणी माजी अध्यक्षांना अटक

ब्रेकिंग न्यूज! नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणी माजी अध्यक्षांना अटक

Breaking News | Ahmednagar: २९२ कोटींचा घोटाळा प्रकरण, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारीया अटक. (Arrested)

Former president arrested in case of urban misappropriation

अहमदनगर: नगर जिल्ह्यातील नगर अर्बन गैर व्यवहार प्रकरण चांगलेच गाजले होते. याप्रकरणी अधिक खुलासे समोर येत आहे. नगर अर्बन गैर व्यवहार प्रकरणी माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारीया (वय ७२, रा. टाकळी ढोकेशवर ) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी पहाटेच्या दरम्यान अटक केली. या कारवाईमुळे माजी संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे

नगर अर्पण गैरव्यवहार प्रकरणी माजी संचालक मनेष साठे व अनिल कोठारी यांना दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या गैरव्यवहार प्रकरणी बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानंतर आता पोलिसांनी माजी संचालकाडे मोर्चा वळविला आहे. फॉरेन्सिक ऑडिट नुसार हा एकूण २९२ कोटींचा घोटाळा असून, यामध्ये शंभरहून अधिक आरोपी आहेत. यातील बँकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली होती.

10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका –  Education Portal 

तत्कालीन अध्यक्ष व संचालक संचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे माजी संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. यातील काही आरोपी फरार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने मुंबईतील संस्थेकडून फॉरेन्सिक ऑडिट करून घेण्यात आले. त्यानंतर घोटाळ्यात कोणाचा कसा सहभाग आहे, हेही स्पष्ट झालेले आहे. त्याआधारे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून, इतरही आरोपींना पोलिसांकडून लवकरच अटक केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Former president arrested in case of urban misappropriation

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here