मोठी बातमी: अहमदनगरमधून माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात अटक
Breaking News | Ahmednagar: मोठी बातमी :अहमदनगरमधून माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात अटक.
राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. भानुदास मुरकुटे असे आमदाराचे नाव आहे. राहुरी पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी संध्याकाळी फिर्याद दाखल केली होती. 2019 पासून मुंबई, दिल्ली तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीनंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले.
श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर आयपीसी कलम 376,328,418,506 अन्वये राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलीस मुरकुटे यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मात्र कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. ते रात्री उशिरा श्रीरामपूर शहरात दाखल झाले. रात्री साडेअकराच्या दरम्यान राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तर या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: Former MLA from Ahmednagar arrested in women abuse case
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study