Home संगमनेर संगमनेर: घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला सक्तमजुरी

संगमनेर: घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला सक्तमजुरी

Breaking News | Sangamner: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ४० वर्षीय आरोपीला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाचीही शिक्षा सुनावली.

Forced labor to the accused who molested a minor girl 

संगमनेरः अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ४० वर्षीय आरोपीला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाचीही शिक्षा सुनावली संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली होती. . ही घटना ५ मे २०१९ ला घडली होती. बुधवारी (दि. १६) हा निकाल येथील अतिरिक्त सहजिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी दिला .

याबाबत त्याच्याविरुद्ध १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला होता. आनंदा किसन चौधरी (वय ४०, रा. शिरसगाव धुपे, ता. संगमनेर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. घडलेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबीयांसमवेत घराबाहेर झोपली होती. रात्री एक वाजेच्या सुमारास चौधरी याने तेथे जात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. मुलीने अल्पवयीन मुलीची साक्ष महत्त्वपूर्ण पळून जाणाऱ्या चौधरी याला पकडल्यानंतर त्याला मंदिरात बसवून पोलिसांना माहिती देण्यात आली होती. चौधरी याला ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. येथील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक भरत दाते यांनी अधिक तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बी. जी. कोल्हे यांनी एकूण पाच साक्षीदार तपासले. त्यात अल्पवयीन मुलीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार प्रवीण डावरे यांनी काम पाहिले. आरडाओरड केल्याने तिच्या कुटुंबातील सदस्य जागे झाले. त्यावेळी चौधरी याने तेथून पळ काढला. पाठलाग करून त्याला पकडण्यात आले होते.

Web Title: Forced labor to the accused who molested a minor girl 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here