Home संगमनेर संगमनेर: चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरी

संगमनेर: चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरी

Sangamner Crime: न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

Five years hard labor for knife attack accused

संगमनेर:  चाकुने हल्ला करणाऱ्या आरोपीला येथील न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आठ वर्षांपूर्वी ४ मे २०१६ रोजी अकोले शहरातील सारडा कॉम्प्लेक्समध्ये मोबाईल शॉपी चालवणाऱ्या गणेश सुधाकर रासने यांचे वाशेरे येथील भरत पांडूरंग भांगरे (वय ६०) बाच्याशी अकोले बसस्थानकावर किरकोळ भांडण झाले होते. त्यानंतर दोघेही घरी निघून गेले. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी भांगरे दुसऱ्या दिवशी पुन्हा अकोले शहरात आला. ५ मे रोजी रात्री नऊच्या सुमारास गणेश रासन आपले मित्र अतुल नवले यांच्या नवले कॉम्प्लेक्समध्ये बोलत असताना अचानक तेथे आलेल्या आरोपी भरत भांगरे याने त्यांना शिवीगाळ करीत थेट आपल्याकडील चाकूने रासने यांच्यावर वार केले.

या घटनेत गणेश रासन रक्तभंबाळ झाले. अतुल नवले यांनी मध्यस्थी करीत गणेश रासने यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने नवले यांच्यावरही हल्ला केला, त्यात त्यांच्या बोटांना दुखापत झाली होती. याप्रकरणी जखमी गणेशचा भाऊ दिनेश रासने यांनी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी भरत भांगरे याच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नासह मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्यावरुन गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली होती.

या प्रकरणाचा तपास अकोल्याचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक महिंद्र अहिरे यांनी केला व संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात त्याचे दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याचे कामकाज अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर चालले. सरकार पक्षाच्या वतीने अभियोक्ता वी. जी. कोल्हे यांनी सात साक्षीदारांची तपासणी केली. त्यांनी केलेला प्रबळ मुक्तिवाद, पोलिसांनी सखोल तपासाअंती सादर केलेले पुरावे, प्रत्यक्षदजींनी सांगितलेला घटनाक्रम प्रग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी भरत पांडुरंग भांगरे (वय ६०, रा. वाशेरे, ता. अकोले) वाला पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा व २५ हजार रुपयांचा दंड सुनावला. दंडातील अर्थी रक्कम जखमी गणेश रासने यांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Five years hard labor for knife attack accused

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here