पाच वर्षांच्या मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार
एका युवकाने घराशेजारील पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार (abused) आरोपीला अटक; दोन दिवसांची पोलिस कोठडी.
नवरगाव (जि. चंद्रपूर): इंदिरानगर, रत्नापूर येथील एका युवकाने घराशेजारील पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. बुधवारी दोन दिवसांनी मुलीची आंघोळ करून देताना आईला संशय आल्याने ही घटना उघडकीस आली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.
त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज डी. कुंभरे (२१, रा. इंदिरानगर, रत्नापूर) याने दोन दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केला. मुलगी लहान असल्याने कुणालाही काही सांगितले नाही. दोन दिवसांनंतर मुलीची आंघोळ करून देताना आईच्या लक्षात ही बाब आली आणि मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास केला व आरोपी सूरज कुंभरे याला ताब्यात घेतले.
Web Title: the five-year-old girl was abused by her neighbor
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App