Home अहमदनगर पाच हजारांची लाच, मंडल कृषी अधिकारी निलंबित

पाच हजारांची लाच, मंडल कृषी अधिकारी निलंबित

Breaking News | Ahmednagar:  शेततळ्याच्या तांत्रिक मंजुरीसाठी शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच स्वीकारतानाच्या व्हिडिओची गंभीर दखल घेत कृषी मंडल अधिकारी निलंबित.

Five thousand bribe, Mandal Agriculture Officer suspended

राशीन : कर्जत तालुक्यातील राशीन येथील मंडल कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सातपुते यांनी शेततळ्याच्या तांत्रिक मंजुरीसाठी शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच स्वीकारतानाच्या व्हिडिओची गंभीर दखल घेत राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सातपुते यांना निलंबित केले.

सातपुते यांच्याविरोधात विभागीय चौकशीअंती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी आयुक्त गेडाम यांनी स्पष्ट केले. ९ जानेवारी रोजी कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी येथील शेतकऱ्यांकडून शेततळ्याच्या तांत्रिक मंजुरीसाठी पाच हजारांची लाच घेण्याचा प्रकार राशीनच्या मंडल कृषी कार्यालयात घडला. कार्यालयातच या प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण झाल्याचे स्पष्ट झाल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली.

10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका –  Education Portal 

शेततळे, फळबाग लागवड योजना आदी योजनांचा शेतकरी लाभ घेताना शेतकऱ्यांची अडवणूक करणे, पिळवणूक करणे, लाभार्थ्यांला पैशाची मागणी करणे अशा तक्रारी राशीनचे मंडल कृषी अधिकारी सातपुते यांच्याविरोधात देशमुखवाडी येथील शेतकऱ्यांनी केली होती. या सर्व प्रकाराची दखल घेऊन अखेर सातपुते याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Web Title: Five thousand bribe, Mandal Agriculture Officer suspended

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here