पाच विद्यार्थी देवगडच्या समुद्रात बुडाले; 4 मुलींचे मृतदेह हाती
Breaking News Today: पुण्याहून आलेले पाच विद्यार्थी समुद्रात बुडाल्याची घटना. चार मुलींचे मृतदेह हाती तर एक मुलगा बेपत्ता.
सिंधुदुर्ग: देवगड येथील समुद्रात पाच विद्यार्थी बुडाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये चार मुली आणि एक मुलाचा समावेश आहे. चार मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, एक अद्याप बेपत्ता आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे, यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर, राम डिचोलकर हा मुलगा अद्याप बेपत्ता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथील संकल्प सैनिक अकादमीची सहल देवगड येथे आली होती. त्यावेळी हे पाच जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले असताना ही घटना घडली आहे. दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पाच विद्यार्थ्यांपैकी चार मुलींचे मृतदेह हाती लागले असून ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलवण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीच्या 35 जणांची सहल आली होती. समुद्र किनाऱ्यावर पोहोचताच विद्यार्थ्यांनी समुद्रात धाव घेतली. या गृपमधील काही जण समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. मात्र पाण्याच्या अंदाज न आल्याने यातील चार मुली आणि एक मुलगा बुडाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात आहेत.
Web Title: Five students drowned in Devgad sea Dead bodies of 4 girls
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App