पोलीस बनण्याचे स्वप्न भंगले, एसटी बसने पाच जणांना चिरडले, तिघांचा मृत्यू
Beed Accident: अपघातात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू.
बीड: एसटी महामंडळाच्या बसने पाच तरुणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड-परळी रस्त्यावर असलेल्या घोडका राजुरी फाट्याजवळ हा अपघात घडला. अपघातात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दररोजप्रमाणे आजही पहाटे सर्वजण व्यायामासाठी रस्त्यावर गेले होते. सविस्तर माहिती अशी की, पोलीस भरतीची तयारी करणारे 5 तरुण आज (19 जानेवारी) सकाळी बीड -परळी रस्त्यावर व्यायामासाठी गेले होते. यादरम्यान एका भरधाव एसटी बसने त्यांना चिरडले. या दुर्दैवी घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे.
पोलीस बनण्याचे स्वप्न भंगले या घटनेत बालाजी मोरे, ओम घोडके, आणि विराज घोडके, अशी मृत तरुणांची नावे आहेत. तरुणांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे.
अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरु आहे. परळी महामार्गावर झालेल्या अपघातात बस सिमेंटच्या रस्त्यावरून खाली घसरली असून बसचा मागच्या काचा फुटल्या आहेत. या बसमध्ये प्रवासी होते का याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नसून नेमका कशाने अपघात झाला? याचा तपास पोलीस करत आहेत.
Web Title: Accident Five persons crushed by ST bus, three killed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News