सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात, पाच ठार, तीन जखमी
Breaking News | Nashik Accident: भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
नाशिक: नाशिकच्या दिंडोरी म्हसरूळ रोडवर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत तर तीन जण जखमी झाले आहे. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. आज, एका बोलेरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान घटनास्थळी म्हसरुळ पोलिस दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. दरम्यान याठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने वाहतुक ठप्प झाली आहे.
दिंडोरी रोडवर ग्लोबल स्कूल जवळ बोलेरोचे टायर फुटून हा भीषण अपघात झाला. वणी दर्शनावरुन परतत असताना या पाचही भाविकांचा काळाने घात केला. अपघात द्राक्ष व्यापारी रमकेश यादव, मुकेश यादव यांचेसह पाच जण ठार झाले आहेत. तर तीन जखमी आहेत.
बोलेरो जीप मधील व्यक्ती हे सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेऊन परतत होते. या बोलेरो जीपच्या चालकाचा ताबा सुटल्यानंतर हा अपघात झाल्याचा संशय प्रत्यक्षदर्शी आणि मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केलाय. दुचाकीवरील दोघांचाही यात जागीच मृत्यू झालाय. रुग्णवाहिका देखील उशिरा आल्याचा आरोप मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींनी केलाय.
Web Title: Five killed in horrific accident while returning from Saptashringi Devi’s
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study