कोपरगाव येथील जेलमधील पाच कैद्यांना करोनाची लागण
कोपरगाव | Koparagaon: कोपरगाव येथील सबजेल मधील पाच कैद्यांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे व कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.
कोपरगाव सबजेल मधील ६१ कैदी व ७ जेलगार्ड तालुका व शहर पोलीस ठाण्याचे ३० पोलीस असे ९८ जणांची शुक्रवारी करोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ९३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाच कैद्यांना करोनाची बाधा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाच कैद्यांमध्ये श्रीरामपूरचे वर्ग केलेले चार व कोपरगाव शहर पोलिसांनी मालेगाव येथून आणलेला एका कैद्याचा समावेश आहे. या कैद्यांना स्वतंत्र विलगीकरण करण्यात आले आहे. पाच दिवसांनी पुन्हा कैद्यांची करोना तपासणी करण्यात येणार आहे. या पोलीस ठाण्यात कोपरगाव ,राहता, लोणी, शिर्डी या भागातील आरोपींना जेलमध्ये ठेवले जाते.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Five inmates of Kopargaon jail contracted coronavirus