Home अकोले अकोले तालुक्यात आश्रमशाळेतील पाच मुलींचा विनयभंग

अकोले तालुक्यात आश्रमशाळेतील पाच मुलींचा विनयभंग

Breaking News | Akole Crime: एका शासकीय आश्रमशाळेतील पाच अल्पवयीन मुलींची शिक्षकानेच छेडछाड करून विनयभंग केल्याची घटना.

Five girls molested in Ashram School in Akole taluka

अकोले : तालुक्यातील एका शासकीय आश्रमशाळेतील पाच अल्पवयीन मुलींची शिक्षकानेच छेडछाड करून विनयभंग केला. दोन वर्षांनी ही घटना उघडकीस आली. पीडितेने अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर भाऊराव धुपकर या शिक्षकाला अटक केली आहे.

शाळेची मुख्याध्यापिका, शिक्षिका व एक शिपाई असे तीनजण फरार आहेत. अल्पवयीन पीडित मुलींनी अकोले पोलिसांत फिर्याद दिली आहे. पीडिता व तिच्या मैत्रिणी सन २०२३ मध्ये ८वीमध्ये निवासी होस्टेलवर राहत होत्या. शिक्षक धुपेकर याने पीडितेला पकडून तीचा विनयभंग केला. त्यानंतर इयत्ता नववीत असताना धांडे मामा (शिपाई) यांनी या मुलींचा पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मुख्याध्यापिका कुलथे यांना सर्व प्रकार पीडित मुलींनी वेळोवेळी सांगितला असता झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुम्हाला शाळेतून काढून टाकू, अशी धमकी त्यांनी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अकोले पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Breaking News: Five girls molested in Ashram School in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here