Home महाराष्ट्र इनोव्हामध्ये पाच कोटींची रोकड सापडली, पण कारमालकाने केला वेगळाच दावा, म्हणाला….

इनोव्हामध्ये पाच कोटींची रोकड सापडली, पण कारमालकाने केला वेगळाच दावा, म्हणाला….

Pune Cash Seized: प्रशासनाने काल सायंकाळी मोठी कारवाई करत जवळपास पाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली. 

Five crore cash was found in the Innova, but the car owner made a different claim cash Seized

पुणे: प्रशासनाने काल सायंकाळी मोठी कारवाई करत जवळपास पाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पुणे-सातारा महामार्गावर खेड-शिवापूर टोलनाक्यावर ही कारवाई करण्यात आली.

माहिती अशी की, ज्या इनोव्हा क्रिस्टा गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली ती गाडी सांगोला येथील व्यावसायिक अमोल नलावडे यांच्या नावावर आहे. मात्र ही गाडी मी जून महिन्यातच अकोला येथील बाळासाहेब आसबे नावाच्या व्यक्तीला विकल्याचा दावा नलावडे यांनी केला आहे. कोट्यवधी रुपयांची रक्कम सापडल्याने खळबळ उडाल्यानंतर इनोव्हा कारचे मालक अमोल नलावडे यांनी आपली बाजू मांडताना म्हटलं आहे की, “मी जून २०२४ मध्ये माझी कार अकोला येथील बाळासाहेब आसबे यांना विकली आहे. त्यांनी कारची रक्कमही माझ्या बँक खात्यात जमा केली. परंतु कागदपत्रे त्यांच्या नावावर करायची राहून गेली असल्याने कारमालक म्हणून माझे नाव येत आहे. मात्र आता त्या गाडीशी किंवा त्यात सापडलेल्या पैशाशी माझा कसलाही संबंध नाही. त्या गाडीत कोण-कोण होतं, हेदेखील मला माहीत नाही,” असा दावा नलावडे यांनी केला आहे.

दरम्यान, अमोल नलावडे यांनी जबाबदारी झटकली असली तरी जप्त करण्यात आलेली रक्कम नेमकी कोणाची आहे आणि कुठे नेली जात होती, याबाबतचा तपास करण्यासाठी पुढील काही दिवसांत पोलिसांकडून नलावडे यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवसांत चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र विरोधक वेगवेगळा आरोप करीत असल्याचे समोर येत आहे.

Web Title: Five crore cash was found in the Innova, but the car owner made a different claim cash Seized

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here