उद्यापासून सलग पाच दिवस सुट्टी, शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर
CM Eknath Shinde: 29 सप्टेंबरला ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली.
मुंबई : 28 सप्टेंबरला म्हणजे गुरुवारी अनंत चतुर्दशीची सुट्टी आहे. 29 सप्टेंबरला ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ईदची सुट्टी सरकारनं जाहीर केलीय. गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे 28 तारखेला आहे. त्यामुळे ईदची सुट्टी परवा जाहीर करण्यात आलीय. 28 सप्टेंबरला म्हणजे गुरुवारी अनंत चतुर्दशीची सुट्टी आहे. त्यापाठोपाठ 29 सप्टेंबरला ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
शनिवारी तुम्हाला सुट्टी असेल तर शनिवार, रविवार सुट्टी आणि सोमवारी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीची सुट्टी अशी सलग पाच दिवसांची सुट्टी तुम्हाला मिळू शकणार आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांचं योग्य व्यवस्थापन करणं पोलिसांना शक्य व्हावं, यासाठी शुक्रवारची सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
Web Title: Five consecutive days off from tomorrow, Eid holiday announced on Friday
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App