Home अहमदनगर विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर ! अहिल्यानगरमध्ये…..

विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर ! अहिल्यानगरमध्ये…..

Vidhansabha Election 2024 : अजित पवार गटाने आज आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात एकूण 38 नावांचा समावेश.

first list of candidates of Ajit Pawar group for the assembly elections 

NCP Ajit Pawar: भारतीय निवडणूक आयोगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी निवडणुकांची घोषणा केली. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

आता महायुती मधील आणखी एका घटक पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अजित पवार गटाने आज आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात एकूण 38 नावांचा समावेश आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन उमेदवारांचा समावेश आहे.

अहिल्या नगर जिल्ह्यातील नगर शहर, राहुरी आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा आज करण्यात आली आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संग्राम जगताप, कोपरगावमधून विद्यमान आमदार आशुतोष काळे अन अकोले विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार किरण लहामटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत कोणाला मिळाली संधी ते जाणून घ्या.

बारामती- अजित पवार

येवला- छगन भुजबळ

आंबेगाव- दिलीप वळसे पाटील

कागल- हसन मुश्रीफ

परळी- धनंजय मुंडे

दिंडोरी- नरहरी झिरवाळ

अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम

श्रीवर्धन- आदिती तटकरे

अंमळनेर- अनिल भाईदास पाटील

उदगीर- संजय बनसोडे

अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले

माजलगाव- प्रकाश दादा सोळंके

वाई- मकरंद पाटील

सिन्नर- माणिकराव कोकाटे

खेड आळंदी – दिलीप मोहिते पाटील

इंदापूर- दत्तात्रय भरणे

अहमदपूर- बाबासाहेब पाटील

शहापूर- दौलत दरोडा

पिंपरी- अण्णा बनसोडे

कळवण- नितीन पवार

वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे

चिपळूण- शेखर निकम

मावळ- सुनील शेळके

जुन्नर- अतुल बेनके

मोहोळ- यशवंत माने

हडपसर- चेतन तुपे

देवळाली- सरोज आहिरे

चंदगड – राजेश पाटील

इगतुरी- हिरामण खोसकर

तुमसर- राजे कारमोरे

पुसद -इंद्रनील नाईक

अमरावती शहर- सुलभा खोडके

नवापूर- भरत गावित

पाथरी- निर्णला विटेकर

मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

अहमदनगर शहर- संग्राम जगताप

कोपरगाव- आशुतोष काळे

अकोले – किरण लहामटे

Web Title: first list of candidates of Ajit Pawar group for the assembly elections 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here