Home बीड गोळीबार;अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी

गोळीबार;अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी

Beed Firing: बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार, या गोळीबारामध्ये मरळ वाडीचे यांचा जागीच मृत्यू.

Firing Sarpanch of Ajit Pawar's group died on the spot

बीड : बीडच्या परळीत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परळीतील येथील बँक कॉलनीत ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून यामध्ये एक ठार तर एक गंभीर जखमी असल्याचे माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचं निधन झालं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला. या गोळीबारामध्ये मरळ वाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते जखमी आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत जखमीवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत.

मयत झालेले बापू आंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करत आहेत त्यासोबतच जखमी झालेले ज्ञानबा गीते हे सुद्धा धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत तर तिसरे जखमी महादेव गीते हे बबन गीते जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांचे समर्थक आहेत.

हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला अथवा कोणी कुणावर गोळी झाडली हे अद्याप समजू शकले नाही ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले मात्र अद्याप घटना कशामुळे घडली हे पुढे येऊ शकलेलं नाही. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Web Title: Firing Sarpanch of Ajit Pawar’s group died on the spot

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here