गरबा खेळताना बाहेर काढल्याच्या रागातून गोळीबार
Breaking News | Pimpari Crime: गरब्यातून कॉलर पकडून काढल्याच्या बाहेर कारणावरून झालेल्या भांडणात एकावर पिस्तुलातून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात.
पिंपरी: गरब्यातून कॉलर पकडून काढल्याच्या बाहेर कारणावरून झालेल्या भांडणात एकावर पिस्तुलातून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच हवेत गोळीबार करून परिसरात दहशत माजवत आरोपी पसार झाले. ही घटना खेड तालुक्यातील म्हाळुंगे येथे घडली.
नीलेश आसाटी (३८, रा. म्हाळुंगे, ता. खेड) असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. सौरभ मुळे (२७) आणि त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज गणपत कदम (३०) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथे छावा प्रतिष्ठान मित्र मंडळाच्या वतीने भैरवनाथ मंदिराजवळ नवरात्र उत्सव व दांडिया तसेच गरबा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. १२ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम सुरू असताना रात्री सव्वादहाच्या सुमारास सौरभ मुळे याने शंकर नवघणे यांच्या मुलाला गरव्यातून कॉलर पकडून बाहेर काढले. या कारणावरून शंकर नवघणे व सौरभ मुळे यांचे भांडण झाले होते. त्यानंतर थोड्या वेळाने शंकर याची पत्नी व सौरभ यांची आई यांचे त्या ठिकाणी भांडण झाले. या भांडणामुळे दांडियाचा कार्यक्रम बंद करण्यात आला. त्यामुळे तेथील महिलांनी सौरभसोबत भांडण करून, ‘तू बाहेरून येऊन आमच्या भागात राहतोस आणि आमच्यावर दादागिरी करतोस का, असा जाब विचारून त्याला हाताने, चपलांनी मारहाण केली. दरम्यान, सौरभला मारहाण केल्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या दोन जणापैकी एकाने नीलेश असाटी याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्याजवळ असलेल्या पिस्तुलातून असाटी यांच्या छातीत गोळी मारली. यात असाटी हे गंभीर जखमी झाले. सौरभसोबत असलेल्या दुसऱ्या आरोपीने त्यांच्या डोक्यावर वीट मारून दुखापत केली.
Web Title: Firing out of anger at being kicked out while playing garba
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study