Home नाशिक पोलीस चौकी कशी काय जळाली ? कारण ऐकून तुम्ही डोक्यालाच हात लावाल

पोलीस चौकी कशी काय जळाली ? कारण ऐकून तुम्ही डोक्यालाच हात लावाल

Nashik News: बिटको चौकात आग पोलीस चौकीला आग (Fire) लागल्याने जळून खाक झाल्याची घटना.

Fire in Bitco Chowk Incident of police outpost being gutted due to fire

नाशिक: नाशिकरोड परिसरातील बिटको चौकात आग पोलीस चौकीला आग लागल्याने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.  गुरुवारी पहाटे ही आगीची घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मित जळीताची नोंद करण्यात आली आहे. मात्र, पोलीस चौकीला आग कुणी लावली ? हे धाडस नेमकं कुणी केलं ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. पोलीस चौकीला आग लागण्यामागील कारण समोर आल्याने नाशिकमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळयाच्या दरम्यान काही पोलीस चौकी तयार करण्यात आल्या होत्या. नंतरच्या काळात याच पोलीस चौक्या शहरातील वाहतुक पोलिसांना देण्यात आल्या होत्या. वाहतुक पोलीस आपले कर्तव्य बजावत असतांना पोलीस चौकीचा वापर करत असत. पावसाळ्यात असो नाहीतर उन्हाळ्यात या पोलीस चौक्या वाहतुक पोलिसांची महत्वाच्या ठरल्या आहेत.

पण, गुरुवारी पहाटेच्या वेळी बिटको चौक येथील पोलीस चौकीला आग लागून ती जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर पोलीसांनाही मोठा धक्का बसला आहे.

पहाटेच्या वेळी काही गर्दूल्ल्यानी थंडी पासून बचाव करण्यासाठी पोलीस चौकीच्या बाजूला टायर जाळले होते. शेकोटी करून ते थंडी पासून संरक्षण करत होते. पण त्याच वेळी टायर अगदी पोलीस चौकीच्या शेजारी असल्याने चौकीलाही आग लागली.

पोलीस चौकीला आग लागल्याचे पाहून ती विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठ्या प्रमाणात लागल्याने गर्दूल्ल्यांनी तेथून धूम ठोकली, दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचा निष्कर्ष पोलीसांनी काढला आहे.

Web Title: Fire in Bitco Chowk Incident of police outpost being gutted due to fire

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here