धक्कादायक! आर्थिक तणावातून एकाच कुटुंबातील तिघांनी एकाचवेळी विषारी औषध घेऊन आत्महत्या
Jalgaon Crime News : एकाच कुटुंबातील वृध्दासह पत्नी आणि मुलगा अशा तीन जणांनी एकाचवेळी विषारी औषध घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
जळगाव: जळगाव तालुक्यातील वडली येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील वृध्दासह पत्नी आणि मुलगा अशा तीन जणांनी एकाचवेळी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी 10 वाजता ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर त्यांच्या पत्नी आणि मुलाची प्रकृती गंभीर आहे. दोघांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. नारायण दंगल पाटील (वय : 66, रा. वडली ता. जळगाव) असं मयत वृध्दाचं नाव आहे.
डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि उदरनिर्वाहाचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने आयुष्य जगायचे कसे या विवंचनेत तिघांनी गुरुवारी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून विषारी औषध प्राशन केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
जळगाव तालुक्यातील वडली गावात नारायण पाटील हे आपल्या पत्नी भारती नारायण पाटील आणि मुलगा गणेश नारायण पाटील याच्यासोबत वस्तव्याला होते. त्याच्या दोन मुलींचे लग्न झाले आहे, तर एक मुलगा रोजगारानिमित्ताने दुसऱ्या गावी राहतो. गुरूवारी सकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान नारायण पाटील, त्यांची पत्नी भारती पाटील आणि मुलगा गणेश पाटील यांनी तिघांनी घरात असताना विषारी औषध सेवन केलं. त्यांनतर अत्यवस्थ वाटू लागल्यानं गणेशनं गावात राहणारा मित्र श्यामला फोन करून घरी येणाचे सांगितले. त्यानुसार श्याम हा घरी गेल्यावर आईवडीलांसह मुलगा गणेश हे तिघे गळ्यात गळा टाकलेल्या अवस्थेत दिसून आले.
श्यामने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने तिघांना खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. उपचार सुरु असतांना अवघ्या दोन तासात तिघांपैकी नारायण दंगल पाटील यांचा उपचारादरम्यान सकाळी 10 वाजता मृत्यू झाला तर त्यांची पत्नी भारती आणि मुलगा गणेश या दोघांची प्रकृती गंभीर आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Web Title: financial stress, three members of the same family committed suicide
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App