Home संगमनेर संगमनेर: आंघोळ करतांना अल्पवयीन मुलीचे चित्रीकरण, पोक्सोसह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

संगमनेर: आंघोळ करतांना अल्पवयीन मुलीचे चित्रीकरण, पोक्सोसह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Sangamner Crime: चारही बाजूंनी कापडी बॅनर व उघडे छत अशा बाथरूममध्ये अंघोळ करत असताना शेजारील एका तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये या मुलीचे चित्रिकरण.

Filming of minor girl while taking a bath, case of atrocity with POCSO

संगमनेर सोळा वर्षीय -अल्पवयीन मुलगी आपल्या घराशेजारील लाकडी काठ्यांचे व त्याला चारही बाजूंनी कापडी बॅनर व उघडे छत अशा बाथरूममध्ये अंघोळ करत असताना शेजारील एका तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये या मुलीचे चित्रिकरण केले. सदर आरोपीने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तीचा विनयभंग केला. या प्रकरणी अकबर युनुस सय्यद या तरुणावर तालुका पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत व त्या नंतर ट्रासिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना तालुक्यातील एका गावात सोमवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत तक्रारदार मुलीने म्हटले आहे की, मी आईवडील व इतर नातेवाईक असे एकत्र कुटुंबासह या ठिकाणी रहात आहोत. माझे आईवडील मजुरी करुन त्यावर आमचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मी इयत्ता १० वी च्या वर्गात शिक्षण घेत आहे. आमचे घराचे शेजारीच अकबर युनुस सय्यद हा त्याचे कुटुंबासह राहणेस आहे. आमचे घरासमोर लाकडी काठ्या रोवुन त्याला चहु बाजुने बॅनरचे कागदाचा आडोसा लावुन सदर बाथरुमचे छत हे उघडेच असलेले बाथरुम बनविलेले आहे. दिनांक १०/२/२०२५ रोजी सकाळी १०/३० वाजेच्या सुमारास मी आमचे घरासमोरील असलेल्या बॅनरचे कागदाचे बाथरुममध्ये अंघोळ करत असतांना शेजारी राहणारा अकबर युनुस सय्यद हा बाथरूम शेजारी असलेल्या गवताच्या सौगावर उभा राहुन हातात मोबाईल घेवुन मोबाईल मध्ये बाथरुमच्या उघडया छतातुन व्हीडीओ काढत असल्याचे मला दिसले, तेव्हा मी माझी आईला ओरडुन आवाज दिला. तेव्हा अकबर युनुस सय्यद हा तेथूध पळून गेला. मी ओरडल्याने लागलीच आलेल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर माझ्या आई वडीलांनी अकबर युनुस सय्यद यास त्याचे घरासमोर जावुन व्हीडीओ काढत असलेबाबत विचारणा केली असता त्याने काहीही न सांगता टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे दिली.

अकबर याने अल्पवयीन मुलगी अंघोळ करीत असतांना त्याच्या मोबाईलमध्ये व्हीडीओ काढून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकरणी अकबर सय्यद याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६६/२०२५ बीएनएस ७७ पोक्सो १२ प्रमाणे व त्यानंतर अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायदा अधिनियम १९८९ चे कलम ३ (२) असे वाढीव कलम लावून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Filming of minor girl while taking a bath, case of atrocity with POCSO

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here