Home कोल्हापूर महिला सहा. पोलीस उप निरीक्षक ४० हजारांची लाच घेताना जाळ्यात

महिला सहा. पोलीस उप निरीक्षक ४० हजारांची लाच घेताना जाळ्यात

Breaking News  Kolhapur Bribe Case: अपघात प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील वाहन सोडवण्यासाठी तक्रारदारकडून 60 हजारांची मागणी करून तडजोडीअंती 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना.

Female Police Sub-Inspector caught taking bribe of Rs. 40,000

कोल्हापूर | गडहिंग्लज : अपघात प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील वाहन सोडवण्यासाठी तक्रारदारकडून 60 हजारांची मागणी करून तडजोडीअंती 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडहिंग्लज पोलीस ठाण्याकडील सहायक पोलीस उपनिरीक्षक नीता शिवाजी कांबळे (वय 57) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

याबाबत माहिती अशी तक्रारदार यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला होता. या गुन्ह्याचा तपास कांबळे हिच्याकडे होता. गुन्ह्यातील वाहन सोडवण्यासाठी तक्रारदार यांनी कांबळे हिला विनंती केली. यासाठी 60 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून यातील कलमेही कमी करण्याचे आश्वासन कांबळे हिने दिले होते. पैशाच्या मागणीला कंटाळून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली.

यानंतर पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शनिवारी सापळा रचून कांबळे हिला चाळीस हजार रुपये रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यानंतर गडहिंग्लज शहरातील केडीसी कॉलनीतील तिच्या घराचीही झडती घेण्यात आली. कांबळे हिची नेमणूक गडहिंग्लज पोलीस ठाण्याकडे असली, तरी बहुतांश वेळा ती निर्भया पथकात कार्यरत असल्याने पोलीस ठाण्याकडे कमी कालावधीत गुन्ह्यांच्या तपासात होती. निवृत्तीच्या अंतिम टप्प्यात असताना अशा पद्धतीने तिला कारवाईला सामोरे जावे लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Breaking News: Female Police Sub-Inspector caught taking bribe of Rs. 40,000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here