Home महाराष्ट्र माहेरचे प्रेम प्रकरण समजेल या भीतीने मुलाला संपवले

माहेरचे प्रेम प्रकरण समजेल या भीतीने मुलाला संपवले

Breaking News | Solapur Crime: आईने आत्महत्येचाही प्रयत्न केल्याचे उघड.

Fearing that Maher's love affair would be discovered, the boy was terminated

सोलापूर : माढा तालुक्यात कव्हे येथे सहा वर्षीय चिमुरड्याचा २६ फेब्रुवारी २०२४ रोजी खून झाला होता. यानंतर त्याच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला.

पोलिसांच्या तपासात आईनेच मुलाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड परंतु झाले. कौशल्या गणेश चोपडे असे आरोपी आईचे नाव आहे. तर प्रणव (६) असे खून झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. त्याचे आजोबा नारायण चोपडे यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेरकडील प्रेमप्रकरण सासू, सासऱ्यांना कळते की काय? या भीतीने तिने हे कृत्य केले. घटनेच्या दिवशी प्रथमतः तिने ‘टीव्ही पाहतो काय?’ म्हणत लहान मुलाचा गळा आवळला. नंतर तो मरण पावला की नाही याची खात्री करण्यासाठी त्याला हलवून पाहिले. आपण आत्महत्या केल्यानंतर मुलगा नाहीच मेला तर? असा विचार करून गळा आवळल्यानंतर तिने कुन्हाडीने त्याचे शिर धडावेगळे केले. त्यानंतर तिने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी झाला. त्यामुळे तणनाशक औषधाचे प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Web Title: Fearing that Maher’s love affair would be discovered, the boy was terminated

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here