चाकूचा धाक दाखवत दरोडेखोरांनी साडे ९ तोळे सोने व १ लाख ३५ हजारांचा ऐवज लुटला
श्रीरामपूर | Theft: तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती येथे काल रात्री दोन वाजेच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत घरातील व्यक्तींना धमकी देत सामानाची उचकापाचक करून १ लाख ३५ हजार रुपयांची रोकड व साडे ९ सोने असा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा दरोडा माजी सरपंच आशिष दौंड यांच्या घरावर पडला. त्यांनी लगेचच या घटनेची माहिती फोनवरून परिसरातील नातेवाईकांना दिली. शेजारच्याच मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते पळून गेले.
याबाबत दौंड यांनी श्रीरामपूर शहर ठाणे येथे कळविले कळविले. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप तसेच पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे, नाईक संजय दुधाडे दत्तात्रय दिघे ,पो कॉ किरण पवार, किशोर जाधव, सुनील दिघे ,पंकज गोसावी ,राहुल नरवडे घटनास्थळी भेट दिली.
Web Title: Fearing a knife, the robbers’ theft