वडील भाजपमधून तर खुद्द पुत्र शरद पवार राष्ट्रवादीतून निवडणूक लढविणार
Vidhansabha Election 2024 | Sandip Naik on Ganesh Naik: भाजपचे बडे नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश.
नवी मुंबई : भाजपचे बडे नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. गणेश नाईक बेलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र, भाजपने पहिल्या यादीतच मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे संदीप नाईक यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. दरम्यान, संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासमोर नवे आव्हान असणार आहे. कारण वडील भाजपमधून तर खुद्द संदीप नाईक राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणार असल्याचे बोलेले जात आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर गणेश नाईक यांच्याविरोधात उभा असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार का? असा सवाल संदीप नाईक यांना विचारण्यात आला होता. मात्र, संदीप नाईक यांनी या प्रश्नाला बगल देत उत्तर देणे टाळले आहे. त्यामुळे नाईक पित-पुत्र हे वेगवेगळ्या पक्षातून विधानसभा निवडणुकीला सामोरे जातील, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
संदीप नाईक म्हणाले, भाजपाने मला 2019 आणि 2024 मध्ये दगा दिल्याने मी पक्ष सोडला. भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. गणेश नाईकांचा याच्याशी संबंध नाही. माझा पक्षात अपमान झाल्याने बाहेर पडलो आहे. 2019 साली भाजप पक्षाने दोन्ही विधानसभेत उमेदवारी देतो असा शब्द दिला होता. पण 2019 आणि 2024 साली दगा दिल्याने पक्ष सोडण्याचा मी निर्णय घेतला, असं संदीप नाईक यांनी स्पष्ट केलं आहे.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंदा म्हात्रे यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत मंदा म्हात्रे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अशोक गावडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत मंदा म्हात्रे यांनी 43 हजार 500 मतांनी विजय मिळवला होता. मंदा म्हात्रे यांच्या मताधिक्य विचारात घेता, त्यांना भाजपने पुन्हा एकदा का मैदानात उतरण्यात आले याचा अंदाज येतो. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक मंदा म्हात्रे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं करु शकतात. त्यामुळे आगामी काळात काय काय समोर येणार हे वेळच ठरविणार आहे.
Web Title: Father will contest from BJP and son Sharad Pawar will contest from NCP
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study