अहमदनगर: ट्रॅक्टर चारीत उलटून बाप-लेकीचा मृत्यू
Ahmednagar Accident: श्रीरामपूरजवळील घटना : दोन जखमी, मयत चाळीसगाव तालुक्यातील.
श्रीरामपूर : अशोकनगर येथे सासुरवाडीस भेटण्यासाठी आलेल्या ऊसतोडणी मजूर कुटुंबीयांच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात घडला. त्यात तरुण मजुराचा लहान मुलीसह जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे जखमी झाले आहेत.
मृतांची नावे रविना अमोल बागुल (वय ३ वर्षे) व अमोल रवींद्र बागुल (३०) अशी आहेत. अमोल यांची पत्नी सपना व त्यांचे बाळ जखमी झाले. सोमवारी (दि. ९) रात्री साडेनऊ वाजता वळदगाव शिवारात घडली.
नारायणगाव (जि. पुणे) येथून ट्रॅक्टरमध्ये हे कुटुंबीय अशोकनगरजवळील मालवीयवाडी येथे येत होते. सपना यांचे तेथे माहेर आहे. कुटुंबीय मूळचे न्यायडोंगरी (ता. चाळीसगाव) येथील नारायणगाव येथे ते ऊसतोडणीचे काम करतात. एवढे मोठे अंतर असूनही त्यांनी ट्रॅक्टरने प्रवास केला. रात्रीच्या वेळी रस्त्यावर खड्ड्याचा अंदाज आला नाही.
त्यामुळे अपघात होऊ ट्रॅक्टर उलटला. त्यात दोघांना मृत्यूने कवटाळले. घटनेनंतर मृतांना त्यांच्या मूळ गावी न्यायडोंगरी येथे नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातात दोघांना जीव गमवावा असून लागल्यामुळे शोक व्यक्त होत आहे.
ऊसतोड कामगारांच्या बाबतीतच अशी घटना घडत असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच ऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टरखाली जागीच मृत्यू झाला होता. यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.
Web Title: Father-Leki’s death after being overturned by a tractor Accident
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App