Home महाराष्ट्र आजीला व बापाला नको त्या अवस्थेत पहिले अन बापाने मुलीला संपविले

आजीला व बापाला नको त्या अवस्थेत पहिले अन बापाने मुलीला संपविले

Breaking News | Solapur Crime: आजीला व बापाला नको त्या अवस्थेत मुलीने पाहिल्याने आपल्या अनैतिक संबंधामुळे समाजात बदनामी होईल, या भितीने नराधम बापाकडूनच पोटच्या गोळ्याची खून करून बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयात मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना.

father killed the daughter after seeing the grandmother and father

सोलापूर : आजीला व बापाला नको त्या अवस्थेत मुलीने पाहिल्याने आपल्या अनैतिक संबंधामुळे समाजात बदनामी होईल, या भितीने नराधम बापाकडूनच पोटच्या गोळ्याची खून करून बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयात मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना कुसूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली.

श्रावणी ओगसिध्द कोठे असे मृत मुलीचे नाव आहे. ओगसिध्द रेवणसिध्द कोठे (वय 35) असे अटक करण्यात आलेल्या नराधम बापाचे नाव आहे. ओगसिध्द रेवणसिध्द कोठे याचे स्वतः च्या आईशीच अनैतिक संबंध होते. आठ वर्षाची चिमुरडी श्रावणी हिने या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले होते. या घटनेची वाच्यता होईल, ही भिती त्याला होती. तसेच बायकोसह घरातील सर्वांना या संबंधाची माहिती कळेल आणि नातेवाईकांसह गावात व समाजात आपली बदनामी होईल, अशी भिती नराधम बापाला होती.

गत गुरुवार (दि. 22) रोजी रात्री श्रावणी हीने आपल्या आजोबाच्या घरी जेवण करून आली. व आपल्या जन्मदाता असलेल्या ओगसिध्द याच्या जवळ झोपण्यासाठी गेली. मध्यरात्री नराधम बापाने श्रावणी हिला फिट आल्याचे भासवून तिचा गळा दाबून तिला जिवे ठार मारला व तिचा मृतदेह घरासमोर बांधकामासाठी खणलेल्या खड्डयात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती मंद्रूप पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नायब तहसीलदार व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित प्ररलेला मृतदेह उकरून बाहेर काढले.

Breaking News: father killed the daughter after seeing the grandmother and father

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here