Home नाशिक तरुणाची स्टंटबाजी महागात! अपघातात सासरा, जावयाचा जागीच मृत्यू

तरुणाची स्टंटबाजी महागात! अपघातात सासरा, जावयाचा जागीच मृत्यू

Breaking News | Nashik Accident: बुलेटस्वाराने समोरून दिलेल्या धडकेत ॲक्टिव्हा दुचाकीवरील सासरा, जावयाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.

Father-in-law, son-in-law died on the spot in an accident

नाशिक : भरधाव बुलेटस्वाराने समोरून दिलेल्या धडकेत ॲक्टिव्हा दुचाकीवरील सासरा, जावयाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा भीषण अपघात नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी नाका येथील सर्व्हिस रोडवर रविवारी सायंकाळी ४.४५ वाजता झाला.

महेश भारत नरवडे (वय ३५, रा. जुना साखर कारखाना रोड, पळसे) आणि अनिल बाबूराव लाजरस (वय ६४, रा. गोरेवाडी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. बुलेटस्वार हात सोडून भरधाव बुलेट चालवून स्टंटबाजी करीत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या तरुणांची स्टंटबाजी जावई आणि सासऱ्याच्या जीवावर बेतली. भरधाव बुलेटवर इनोश सतीश ब्राह्मणे (रा. म्हाडा इमारत, जेलरोड पाण्याची टाकी), आणि आर्यन अतुल गायकवाड (रा. विधाता हाउसिंग सोसायटी, सैलानीबाबा चौक) होते. तरुणांच्या स्टंटबाजीच्या नादात बुलेटची ॲक्टिव्हाला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, ॲक्टिव्हावरील सासरा, जावयाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी, मंगेश गायखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुलेटस्वार ब्राह्मणे आणि गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Father-in-law, son-in-law died on the spot in an accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here