Home पुणे धक्कादायक! पतिसमोरच सासरा करायचा सुनेवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक! पतिसमोरच सासरा करायचा सुनेवर लैंगिक अत्याचार

Breaking News | Pune Crime: भोसरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देहविक्रीचा व्यवसाय करण्यास भाग पाडले असता घराबाहेर काढले.

Father-in-law sexually assaults daughter-in-law in front of husband

पिंपरी : पतीसमोर पतीच्या संमतीने सासरा सुनेवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथे उघडकीस आला आहे. सुनेच्या नावाने डेटिंग साईटवर बनावट प्रोफाइल बनवून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचेही उघडकीस आले आहे. यासाठी विवाहितेने विरोध केला असता तिला मुलांसह घराबाहेर काढण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिलेचा १६ वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. तिचे कुटुंब भोसरी येथे वास्तव्यास होते. दरम्यान मागील दोन वर्षांपासून तिचा सासरा तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. यासाठी महिलेच्या पतीची देखील संमती असे. त्यानंतर पती आणि सासऱ्याने मिळून महिलेच्या नावाने डेटिंग साईटवर बनावट प्रोफाइल तयार केले. साईटवरुन वेगवेगळ्या पुरुषांसोबत वेश्या व्यवसाय करण्यास पती आणि सासऱ्याने प्रवृत्त केले. महिलेने देह विक्रीचा व्यवसाय करण्यास नकार दिला असता पती आणि सासऱ्याने तिला अमानुषपणे मारहाण केली. तर तिला मुलांसह घराबाहेर हाकलून देण्यात आले. आता ती महिला बेघर झाली आहे. महिलेने मुंबई मध्ये टिळक नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा गुन्हा भोसरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पती आणि सासऱ्याला अटक केली आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Father-in-law sexually assaults daughter-in-law in front of husband

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here