Home अकोले संगमनेर: खुनाच्या गुन्ह्यातील बाप- लेकाला जन्मठेपेची शिक्षा, अकोलेतील घटना

संगमनेर: खुनाच्या गुन्ह्यातील बाप- लेकाला जन्मठेपेची शिक्षा, अकोलेतील घटना

Breaking News | Sangamner: खुनाच्या गुन्ह्यात बाप- लेकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Father-daughter sentenced to life imprisonment for murder

संगमनेर : खुनाच्या गुन्ह्यात बाप- लेकाला न्यायालयाने जन्मठेपेची आणि प्रत्येकी १५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. ब्राह्मणवाडा (ता. अकोले) येथे ही घटना घडली होती.

मार्तंड मनोहर आरोटे (वय ६०), मयूर मार्तंड आरोटे (वय २२, दोघेही रा. खंडोबाची वाडी, ब्राह्मणवाडा, ता. अकोले) अशी शिक्षा झालेल्या बाप-लेकांची नावे आहेत. त्यांनी केलेल्या मारहाणीत रवींद्र मनोहर आरोटे यांचा मृत्यू झाला होता. येथील अतिरिक्त सहजिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी हा बुधवारी (दि. ४) हा निकाल दिला.

११ मार्च २०२२ ला ब्राह्मणवाडा  येथे ही घटना घडली होती. त्यावेळी मयत रवींद्र आरोटे यांच्या पत्नी ललिता आरोटे यांनी दिलेल्या जबाबावरून अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता. मार्तंड आरोटे, मयूर आरोटे, शकुंतला आरोटे (वय ५५), सोनाली आरोटे (वय २१) अशा एकूण चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सासू आणि सून असलेल्या शकुंतला आणि सोनाली यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अकोले पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायाधीश मनाठकर यांच्या समोर हा खटला चालला. सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी एकूण ७ साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादी आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. मार्तंड आणि मयूर आरोटे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: Father-daughter sentenced to life imprisonment for murder

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here