Breaking News | Sangamner Crime: बाप-लेकांनी युवकाला गंडा घातल्याची घटना. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.
संगमनेर : इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदी-विक्री व्यवहारात अकोलेतील बाप-लेकांकडून संगमनेरातील २७ वर्षीय युवकाची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. . या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यात ७७ लाख ५६ हजार ७२० रुपयांची फसवणूक झाल्याचे नमूद आहे. फेब्रुवारी ते डिसेंबर २०२२ दरम्यान हा प्रकार घडला.
अशोक बन्सीलाल भळगट, पुष्पक अशोक भळगट आणि नीलेश अशोक भळगट (रा. अकोले बसस्थानकासमोर) अशी गुन्हा दाखल झालेल्या बाप-लेकांची नावे आहेत, त्यांच्याविरुद्ध प्रसाद धनंजय रहाणे (वय: २६, रा. रहाणे मळा, गुंजाळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. रहाणे यांचे गुंजाळवाडी येथे इलेक्ट्रिकल सामान विक्रीचे दुकान होते, त्यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याची एका नामांकित इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती करणाऱ्या कंपनीची डिस्ट्रिब्यूटरशिप होती.
२०२१ मध्ये अशोक भळगट यांचा रहाणे यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीसाठी पाहिजे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्यात खरेदी-विक्री व्यवहार सुरू झाला. २०२१ ते २०२२ दरम्यान अशोक भळगट हे इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जात होते. त्यांच्यासह त्यांची मुले पुष्पक आणि नीलेश भळगट हेदेखील मालाची ऑर्डर द्यायचे. त्याकाळात व्यवहार व्यवस्थित असल्याने रहाणे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला.
त्यावर थोड्या दिवसांनी सुरळीत पैसे पाठवणार त्यांनी असल्याचे सांगितले. मात्र, अद्यापही पैसे मिळाले नसल्याने रहाणे यांनी फिर्यादीवरून पोलिसांनी भळगट यांच्यावर गुन्हा नोंदवून घेतला आहे.
२०२२मध्ये भळगट यांनी अधिक माल विकत घेण्यास सुरुवात केली. रहाणे यांनीदेखील पाहिजे तितका माल त्यांना दिला. अधिक माल घेण्याचे राहणे यांनी कारण विचारले असता, भळगट यांनी ग्राहक वाढल्याचे कारण सांगितले.
फेब्रुवारी ते डिसेंबरदरम्यान त्यांनी मोठ्या प्रमाणात माल विकत घेतला. मात्र, मालाचे पैसे नियमित दिले नाहीत, ते देण्याबाबत रहाणे यांनी विनंती केली.
Breaking News: Father and daughter fraud young man in Sangamner