Home औरंगाबाद देवीचे विसर्जन करताना पाण्यात बुडून बाप- लेकाचा मृत्यू

देवीचे विसर्जन करताना पाण्यात बुडून बाप- लेकाचा मृत्यू

Breaking News | Sambhajinagar: देवीचे विसर्जन करताना पाण्यात बुडून बाप- लेकाचा मृत्यू.

Father and daughter drowned in water while immersing the goddess

छत्रपती संभाजीनगर : पूर्णा नदीत देवीचे विसर्जन करताना पाण्यात बुडून बाप- लेकाचा मृत्यू झाला. ही घटना सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील बेलेश्वरवाडी येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

सांडू नामदेव सागरे (वय ४५), निवृत्ती सांडु सागरे (वय २८, रा. बेलेश्वरवाडी (केऱ्हाळा) असे त्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवरात्र उत्सवात सालाबाद प्रमाणे सागरे यांनी घरात देवी बसवलेली होती. शनिवारी देवीचे विसर्जन करण्यासाठी बाप- मृत मुलगा व एक चौदा वर्षांचा त्यांचाच मुलगा असे तिघे पूर्णा नदीत गेले. विसर्जन करण्यासाठी दोघे नदीत गेले, तर चौदा वर्षांचा मुलगा नदीच्या कडेवर थांबला. मृत बाप-लेक नदीतील खड्ड्यात गेल्याने ते पाण्यात बुडाले व त्यांचा मृत्यू झाला. ही घटना चौदा वर्षांच्या मुलाच्या लक्षात येताच. त्याने तातडीने घरी येऊन सांगितले. माहिती मिळतात दत्ता कुडके, हाकिम पठाण, सूर्यभान बन्सोड, संपत पांढरे, लक्ष्मण दुधे आदी नागरिकांनी धाव घेतली. मात्र नदीला पाणी असल्याने शोध लागला नाही. ही माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.

सायंकाळी पाचच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले व त्यांनी शोध मोहीम हाती घेतली. दोन तास त्यांनी शोध घेतला. मात्र त्यांना यश आले नाही. अंधार पडल्याने सातच्या सुमारास शोध मोहीम थांबवण्यात आली. रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, तलाठी विशाल पाटील घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Web Title: Father and daughter drowned in water while immersing the goddess

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here