Home नागपूर खळबळजनक ! पोटच्या मुलीवर बापाने केला अत्याचार; पत्नी बाहेर जाताच…

खळबळजनक ! पोटच्या मुलीवर बापाने केला अत्याचार; पत्नी बाहेर जाताच…

Breaking News | Nagpur Crime: नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका दारुड्या बापाने पोटच्या 14 वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार समोर आला.

father abused the daughter of Pot

नागपूर : नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका दारुड्या बापाने पोटच्या 14 वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पीडित मुलगी गेल्या तीन महिन्यांपासून बापाचा लैंगिक अत्याचार सहन करत होती. शेवटी आईला प्रकार सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. लकडगंज पोलिसांनी तक्रारीवरुन बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी किसन (बदललेले नाव) हा बेरोजगार असून, पत्नी, मुलगी आणि मुलासह लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तो गेल्या चार वर्षांपासून बेरोजगार असून, त्याला दारुचे व्यसन आहे.

किसन कामाला जात नसल्यामुळे पत्नी घराबाहेर पडली. ती खासगी काम करुन संसाराचा गाडा हाकते. मुलगी 14 वर्षांची असून, ती नववीत शिक्षण घेत आहे. दारुड्या किसनाची गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलीवर वाईट नजर होती. गेल्या तीन महिन्यांपासून तो तिच्याशी अश्लील चाळे करत होता. ‘तू आता मोठी झाली आहेस, म्हणून मी तुझा लाड करत आहे’, असे सांगून तो वारंवार तिच्याशी लगट करत होता. मुलीने बापाच्या या घाणरेड्या कृत्याकडे दुर्लक्ष केले.

गेल्या काही दिवसांपूर्वी पत्नी नातेवाईकाकडे धार्मिक समारंभासाठी गेली असताना मध्यरात्रीनंतर झोपेत असलेल्या मुलीशी बापाने अश्लील कृत्य केले. शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने नकार दिला. त्यामुळे तिला बापाने मारहाण केली. त्यानंतर बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

पत्नी कामावर गेल्यानंतर किसन हा मुलाला खेळायला बाहेर पाठवायचा. त्यानंतर मुलीला शारीरिक संबंधाची मागणी करायचा. ती अनेकदा त्याला नकार द्यायची. त्यानंतर तो शिक्षण बंद करण्याची धमकी द्यायचा. तसेच आईला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी घाबरुन जात होती. अखेर त्रासाला कंटाळून आईला प्रकार सांगितला.

Web Title: father abused the daughter of Pot

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here