Home अहिल्यानगर भाजपच्या संकल्प रथ यात्रेसमोर कांदे ओतून शेतकऱ्यांचा निषेध

भाजपच्या संकल्प रथ यात्रेसमोर कांदे ओतून शेतकऱ्यांचा निषेध

Ahmednagar News | Kopargaon:  रथापुढे कांदे ओतून शेतकऱ्यांनी रथाला माघारी पाठवले. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क लादले.

Farmers protest by pouring onions in front of BJP's Sankalp Rath Yatra

कोपरगाव:  उद्योगपती तुपाशी शेतकरी उपाशी, अशा घोषणा देत कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारची संकल्प रथयात्रा गावातून परत फिरविली. महिती रथापुढे कांदे ओतून शेतकऱ्यांनी रथाला माघारी पाठवले. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क लादले. केंद्राचे हे धोरण शेतकरी विरोधात आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना भाजपच्या प्रचारासाठी कशाला वापरता. त्यासाठी खासगी माणसे वापरा, त्यांना त्यांची कामे करू द्या, अशी प्रतिक्रीया यावेळी संतप्त ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

यावेळी खंडू मोरे, भरत मोरे, डॉ. गोरक्षनाथ मोरे, एकनाथ मोरे, प्रभाकर मोरे यांनी या रथाचा तीव्र शब्दात विरोध केला. मोदी सरकार येवून दहा वर्षे होत आली. या काळात शेतकऱ्यांना मारणी घालण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. कांद्याच्या भावाला मोदी सरकार आडवे आले आहे. निर्यात बंदी केली. भाववाढ झाली की हे सरकार काही ना काही निर्णय घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय करते आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला साडेचार हजार रुपये भाव मिळत होता. तेव्हा सरकारच्या पोटात दुखले. त्यांनी कांदा निर्यातबंदी केली त्यामुळे आता बाराशे रुपये भाव मिळत आहे. मोदी सरकारची धोरणे शेतकरी विरोधी व ग्राहक धार्जीने आहेत.

संकल्प रथ नाटेगावमध्ये आला तेव्हा येथील शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीने तुम्ही घेतलेले निर्णय चुकीचे आहे. अचानक कांदा निर्यातबंदी करणे हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.  मोदींनी सुरू केलेली संकल्प यात्रा शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणार आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, असेही गावकऱ्यांनी म्हटले.

Web Title: Farmers protest by pouring onions in front of BJP’s Sankalp Rath Yatra

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here