केंद्रसरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी मोठा शत्रू वाटतो: बाळासाहेब थोरात
सांगली: केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे करून शेती व्यावसाय संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांना पाकिस्तानपेक्षा शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो अशी घणाघाती टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
केंद्रातील कृषी कायद्याच्या विरोधात शुक्रवारी सांगलीमध्ये कॉंग्रेसच्या वतीने ट्रक्टर रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आदी उपस्थित होते.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या नव्या कायद्याबाबत माहिती नाही. या कायद्याची झळ पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांना बसल्याने ते रस्त्यावर उतरले आहे. अजून आपणास फटका बसला नाही. नुकतीच केंद्राने कांद्यावर निर्यातीवर बंदी केली आहे. पाकिस्तानातून कांदा आयात करण्यात येणार असल्याची माहिती समजते. त्यामुळे मोदी सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी हा मोठा शत्रू वाटत आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Farmers are a bigger enemy to the central government Balasaheb Thorat