Home अहमदनगर अहमदनगर: शेततळ्यात पडल्याने बुडून शेतकर्‍याचा मृत्यू

अहमदनगर: शेततळ्यात पडल्याने बुडून शेतकर्‍याचा मृत्यू

Ahmednagar News:  हृदय विकाराचा झटका आल्याने शेततळ्यात पडून शेतकर्‍याचा बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची घटना.

Farmer dies due to drowned after falling in the field

कर्जत: हृदय विकाराचा झटका आल्याने शेततळ्यात पडल्याने शेतकर्‍याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कर्जत तालुक्यातील शिंदे येथे शुक्रवारी(दि.7) दुपारी घडली.

शिवाजी बापू घालमे (50, रा. शिंदे, ता. कर्जत) असे मृत झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी घालमे हे शेतातील कामासाठी गेले होते. शेततळ्याजवळच काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामुळे ते शेततळ्याच्या कागदावरून घसरून पाण्यात पडले.

वाचविण्यासाठी जवळ कोणीही नसल्याने यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी कर्जत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र वाघ हे करत आहेत.

Web Title: Farmer dies due to drowned after falling in the field

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here