Home अकोले अकोले: विहिरीत तोल जाऊन शेतकऱ्याचा मृत्यू

अकोले: विहिरीत तोल जाऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Breaking News | Akole Farmer Death: विहिरीत तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.

Farmer dies after falling into well

अकोले : तालुक्यातील वाशेरे येथे पाचमनी शिवारात बाळासाहेब गंगाधर वाकचौरे वय ४५ वर्षे या शेतकऱ्याचा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या विहिरीत तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ते वाशेरे गावच्या तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष होते.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मयत बाळासाहेब वाकचौरे हे घरातून गेल्या नंतर ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. घरातून दुपारी एक वाजता बाळासाहेब हे शेतात जातो, असे सांगून गेले ते बराच वेळ झाला तरी घरी येईनात म्हणून घरच्यांनी त्यांची शोधा शोध सुरू केली. त्यावेळी ते विहिरीत पडल्याचे साडे तीन वाजण्याच्या सुमारास लक्षात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. विहिरीचे बांधकाम झालेले होते परंतु बांदाच्या बाजूला विहिरीचे काम अर्धवट होते. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन विहिरीत पडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे, अशीही माहिती समोर येत आहे.

 त्यांच्यावर काल रात्री दहा वाजता वाशेरे येथे अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, एक बहीण असा मोठा परिवार आहे. याप्रकरणी अकोले पोलिसांत अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अकोले पोलीस करीत आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Breaking News: Farmer dies after falling into well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here