Home अहिल्यानगर अहमदनगर: खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर: खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Breaking News | Ahmednagar: खासगी सावकाराच्या छळाला कंटाळून श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide).

Farmer commits suicide due to trouble of private moneylender

श्रीगोंदा : शेतीच्या बांधावरून चालू असलेल्या त्रासाला तसेच खासगी सावकाराच्या छळाला कंटाळून श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.३१) श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ येथे घडली. हौशिराम राधू लाटे (वय ६४), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात मनोहर हौशिराम लाटे यांच्या फिर्यादीवरून एका महिलेसह पाच जणांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दखल होताच कोथूळ येथील बाबासाहेब सदाशिव लाटे, यमुना बाबासाहेब लाटे, कुंडलिक बाबासाहेब लाटे, राजेंद्र बाबासाहेब लाटे तसेच शिवाजी रघुनाथ भोसले, या खासगी सावकाराला बेलवंडी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार,  फिर्यादी यांना तसेच त्यांच्या वडिलांना शेतीच्या बांधावरून त्यांच्या भावकीमधील बाबासाहेब सदाशिव लाटे, यमुना बाबासाहेब लाटे, कुंडलिक बाबासाहेब लाटे, राजेंद्र बाबासाहेब लाटे, हे चार जण त्रास देत होते. तसेच गावातील एका खासगी सावकाराकडून फिर्यादी यांच्या वडिलांनी १९९७ साली १० हजार रुपये व्याजाने घेतले होते. सावकार या रकमेचे पाच लाख रुपये मागत त्रास देत असल्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांचे वडील हौशिराम राधू लाटे यांनी बुधवारी (दि. ३१) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घराशेजारील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका –  Education Portal 

आत्महत्येपूर्वी मयत शेतकऱ्याने शेवरीच्या झाडाला सहा ते सात पानी चिठ्ठया लिहून ठेवल्या असून, यामध्ये पाच जणांनी छळ केल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. आतत्महत्येची ही घटना सकाळी साडेसहा वाजता फिर्यादी यांचे चुलत भाऊ सर्जेराव अशोक लाटे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी घटनेची माहिती बेलवंडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

Web Title: Farmer commits suicide due to trouble of private moneylender

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here