कोरोना उपचारासाठी झालेल्या कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
राहुरी | Suicide: शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली.
सुहास सोनवणे वय ४८ नगर मनमाड रोड रा. राहुरी असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोरोनावरील उपचारासाठी सोनवणे यांच्यावर १० लाखाचे कर्ज झाले होते.
सोनवणे हे शेत करून करून आपला उदरनिर्वाह करतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांची पत्नी पुष्पा सोनावणे या कोरोनाबाधित झाल्या होत्या. त्यांच्यावर राहुरी आणि नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या उपचारासाठी ९ ते १० लाख रुपये खर्च आला. घरची परिस्थिती बेताची असल्याने सुहास सोनावणे यांना कर्ज फेडणे अवघड झाले. अशा परिस्थितीत तणावपूर्ण जीवन जगत होते. अखेर कर्जाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाउल उचलले. १६ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला दोरीच्या सहायाने गळफास घेत आपले जीवन संपविले.
Web Title: Farmer commits suicide due to debt for corona treatment