अहमदनगर: कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
Ahmednagar News: डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर कसा कमी होणार या विवंचनेत शेतकऱ्याची आत्महत्या (Suicide).
अहमदनगर: यंदा पाऊस कमी झाल्याने शेतातील पीक उत्पादन घटले. त्यातच डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर कसा कमी होणार या विवंचनेत असलेले सुखदेव गोविंद चितळकर (वय ४६, रा. मल्हारवाडी, साकत, ता. नगर) यांनी नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील साकत येथे शुक्रवारी (दि.२७) सकाळी घडली.
त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवली असून त्यात कर्जबाजारी पणाला कंटाळून जीवन संपवत आहोत, असा उल्लेख केला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यांच्याकडे एका पतसंस्थेचे कर्ज होते. त्याची परतफेड करण्याच्या विवंचनेत आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
एक सुसाईड नोट सापडली असून त्याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Farmer commits suicide due to debt
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App