Home अहमदनगर शेतात दिसला तर हात पाय तोडण्याची धमकी दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या- Suicide

शेतात दिसला तर हात पाय तोडण्याची धमकी दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या- Suicide

Farmer commits suicide by threatening to break limbs if seen in field

Ahmednagar | Rahuriu | राहुरी: शेतात आला तर  हातपाय तोडण्याची धमकी, शेतात जाण्यास मज्जाव केल्याने या धमकीला घाबरून जाऊन सखाराम कोरडे यांनी विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथे दि. 22 मे रोजी घडली.

याबाबत दीपक सखाराम कोरडे, रा. कोळेवाडी, कोरडे वस्ती, ता. राहुरी या तरूणाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले,  दि. 22 मे रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान दीपक कोरडे यांचे वडील सखाराम कोरडे हे त्यांच्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेले होते. तेव्हा आरोपी त्यांना म्हणाले, तू या शेतात यायचे नाही. तुझा शेतीचा काहीही एक संबंध नाही. तसेच तू येथे दिसलास तर तुझे पाय तोडून टाकू, असे म्हणून शिविगाळ केली. तसेच तुझे बिर्‍हाड उचलून घेऊन जा, असे म्हणून पुन्हा शिवीगाळ केली. घडलेल्या या प्रकारामुळे सखाराम कोरडे हे भयभीत झाले होते. टेन्शन आल्याने त्यांनी रोगर नावाचा विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केली. त्यांना आत्महत्या करण्यास आरोपींनी प्रवृत्त केले, असा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे.

दीपक कोरडे याने राहुरी पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या फिर्यादीवरून आरोपी एकनाथ सहादु कोरडे, ज्ञानदेव सहादु कोरडे, सोनाबाई सहादु कोरडे सर्व रा. कोळेवाडी, ता. राहुरी या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे करीत आहेत.

Web Title: Farmer commits suicide by threatening to break limbs if seen in field

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here