Home क्राईम प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक;  हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक;  हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

गोरेगाव परिसरातील एका आलिशान हॉटेलवर छापा टाकून एका सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश, एका प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रीला अटक केल्याचा तसेच तीन मॉडेल्सची सुटका केल्याचा दावा.

Famous actress arrested in Mumbai High profile sex racket busted

मुंबई: सिनेमा सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक झाली असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी गोरेगाव परिसरातील एका आलिशान हॉटेलवर छापा टाकून एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी घटनास्थळावरून एका प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रीला अटक केल्याचा तसेच तीन मॉडेल्सची सुटका केल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

24 वर्षीय भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारीला मुंबई पोलिसांनी काल रात्री म्हणजेच २१ एप्रिल २०२३ रोजी अटक केली आहे. तिच्यावर मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तीन मॉडेल्सचीही सुटका केली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने शुक्रवारी संध्याकाळी हॉटेलच्या खोलीवर छापा टाकला. त्यांनी सांगितले की 24 वर्षीय भोजपुरी अभिनेत्री एजंट म्हणून काम करत होती आणि मॉडेल्सना वेश्याव्यवसायात ढकलत होती. अधिकाऱ्याने सांगितले की, अटक केलेली अभिनेत्री भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच हिंदी, पंजाबी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील ओटीटी शो आणि गाण्याच्या अल्बममध्ये दिसली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या महिला चित्रपटात करिअर करण्यासाठी शहरात आल्या होत्या. त्या कठीण काळातून जात होत्या आणि त्यांना जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी पैशांची गरज होती.’ पण पोलिसांनी या प्रकरणात सगळ्यानांच रंगेहाथ पकडलं आहे.

सुमनला पोलिसांनी अटक केली आहे. आता पोलीस  जो सुमन आणि क्लायंटमध्ये काम करणाऱ्या मध्यस्थाचा शोध घेत आहेत. सुमन कुमारीबद्दल बोलायचे तर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने ‘लैला मजनू’ आणि ‘बाप नंब्री, बेटा दस नंब्री’ यांसारख्या अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री असण्यासोबतच सुमन एक गायिका देखील आहे, तिने हिंदी, पंजाबी आणि भोजपुरीसह अनेक भाषांमध्ये गाणीही गायली आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आरती मित्तलला अटक झाली होती. मुंबईत आरती सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप पोलीसांनी केला होता. यामध्ये प्लॅन आखून पोलिसांनी तिचं सेक्स रॅकेट उघडं पाडलं होतं.

Web Title: Famous actress arrested in Mumbai High profile sex racket busted

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here