Home औरंगाबाद घरच्यांना ती गोष्ट कळाली अन विद्यार्थिनीने संपविले जीवन

घरच्यांना ती गोष्ट कळाली अन विद्यार्थिनीने संपविले जीवन

Breaking News | Suicide: एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने एका शुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याची घटना.

family came to know about it and the student ended her life

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने एका शुल्लक कारणावरून आत्महत्या केली आहे. घरच्यांनी शाळेत घडलेल्या एका घटनेचा जाब विचारल्याने या मुलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  छत्रपती संभाजीनगरमधील देवळाईतील म्हाडा कॉलनीत ही घटना घडली आहे. हि मुलगी एका शाळेत दहावी इयत्तेत शिकत होती. एका दिवशी ती वर्गात शिकत असताना तिला पेन देण्यासाठी एक मुलगा आला होता. या घटनेनंतर काहीच घडले नाही आणि ती घरी गेले होती. मात्र यानंतर या घटनेची माहिती शिक्षकाने जाऊन मुलीच्या कुटुंबियांना दिली होती. यानंतर ही तरुणी घरी आल्यानंतर घरच्यांनी संबंधित तरूणाबाबत तिच्याकडे विचारणा केली. याचा मुलीला प्रचंड राग आला आणि याच रागातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. तिने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. फक्त एका मुलाने पेन दिल्यावरून घडलेल्या या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या घटनेचा पुढील  तपास करत आहेत.

Web Title: family came to know about it and the student ended her life

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here