अहिल्यानगरमध्ये बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस; 66 लाखांच्या नोटा
Breaking News | Ahilyanagar: बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस (Big fake currency racket)
अहिल्यानगर: अहिल्यानगर पोलिसांनी महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. तब्बल 68 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात. दोनशे आणि पाचशे रुपयांचा नोटा आढळून आल्यात. याप्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातून हे रॅकेट ऑपरेट केले जात होते. तेथून बनावट नोटा या इतर जिल्ह्यांमध्ये पुरविल्या जात असल्याचे समोर येत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (वय 33 वर्ष रा. सोलापूर), राजेंद्र कोंडीबा चौघुले (वय 42 रा. कर्जत, अहिल्यानगर), तात्या विश्वनाथ हजारे (वय 40 रा. पाटेगाव तालुका कर्जत) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या आरोपींकडून बनावट नोटा, बनावट नोटा बनवण्याचे मशीन व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शनिवारी रात्री साडेनऊ वाजता राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व पोलीस पथक राहुरी शहरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी तीन व्यक्ती एका मोटारसायकलवरून बनावट नोटा घेऊन येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ठेंगे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी राहुरी शहरात नगर मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावून तिघांना पकडले. त्यांच्याकडे एका बॉक्समध्ये बनावट नोटा आढळून आल्या. एका बँकेच्या मॅनेजरला बोलावून नोटा तपासल्या असत्या त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यात पाचशे रुपयांचे 75 बंडल आढळून आले. त्याची किंमत 37 लाख 50 हजार इतकी आहेत. तर दोनशे रुपयांच्या बनावट नोटांचे 44 बंडल आढळून आले असून, त्याची किंमत 8 लाख 80 हजार रुपये इतकी आहेत.
तिघा आरोपींकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी बनावट नोटा तयार करत असल्याचे ठिकाणाचे नाव सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीतील शितरनगर येथील एका घरावर छापा टाकला. आरोपींना हे घर भाडोत्री घेतले होते. या घरातून एक झेरॉक्स मशिन व प्रिंटर, कटिंग करण्याचे मशीन, नोटा बनविण्याचा कागद, लॅमिनेशन मशीन, कंट्रोलर युनिट व पाचशे रुपयांच्या नोटा प्रिंट मारलेले कागद जप्त केले. प्रिंट केलेले कागदही 18 लाख रुपये किंमतीचे होते. या कारवाई पोलिसांनी 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
Breaking News: Fake currency racket exposed in Ahilyanagar; notes worth Rs 66 lakh seized