Home अहिल्यानगर आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार: देवेंद्र फडवणीस

आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार: देवेंद्र फडवणीस

Ahmednagar News: 2019  साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही. मात्र  ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्ष घेऊन आलो- देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis).

face to face government Devendra Fadanvis

अहमदनगर : शिर्डी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला  आहे.  तसेच  ते म्हणाले,  मी म्हणालो होतो मी पुन्हा येईल, अजून देखल त्याची दहशत आहे. 2019  साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही. मात्र  ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्ष घेऊन आलो. ते शिर्डी येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाला आहे. दोघांची नजर  उपमुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर अशी टीका केली जाते. यावर फडणवीस म्हणाले, आमची नजर खुर्चीवर आहे मात्र ती  खुर्चीच्या संरक्षणासाठी आहे. कोणी आमच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीकडे कोणी वाकड्या नजरेने कोणी पाहू नये, यासाठी आमचे लक्ष मुख्यमंत्र्याच्या खुर्चीकडे आहे.

दुर्दैवाने दुबार पेरणीची वेळ आली तर सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी असणार आहे, असे आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिले. विकासकामांना पैसा कमी पडणार नाही. मराठवाडा, नगर या भागातील पाण्याचा वाद कायमस्वरूपी संपवायचा आहे. वाहून जाणार पाणी इकडे वळविण्यासाठी लवकरच काम सुरू करतोय. आपल्या शेतकऱ्यांना मजबूत करण्याचं काम करतोय. नमो शेतकरी सन्मान  योजना, एक रुपयात पीक विमा योजना अनेक योजना आणल्या आहे. सतत लाईट जात असल्याने अनेक ग्रामीण भागातील यंत्रणा ठप्प होते. मात्र नगर जिल्हा या त्रासापासून मुक्त होणार आहे. नगर जिल्हा कदाचित पहिला सौर ऊर्जा असलेला जिल्हा होईल या पद्धतीने वेगाने काम सुरु होणार आहे आणि निश्चित वेळेत पूर्ण होणार असेही फडणवीस म्हणाले. शिर्डीजवळच्या काकडी गावात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Web Title: face to face government Devendra Fadanvis

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here